Asit Banage
खोबरेल तेलाने गुळण्या
खोबरेल तेलाने गुळण्या केल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात, ज्यामुळे दात पांढरे होण्यास मदत होते. 10-20 मिनिटे तेलाने गुळण्या करा, त्यानंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या करा.
फळे
सफरचंद, गाजर दातांवरील डाग कमी करण्यास मदत करतात.
बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरोक्साइड
बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरोक्साइड यांचे मिश्रण दातांवर हळूवारपणे चोळल्याने पिवळेपणा कमी होतो.
लिंबू आणि मीठ
लिंबू आणि मीठ यांचे मिश्रण दातांवर चोळल्याने पिवळेपणा कमी होतो, पण ते जास्त प्रमाणात वापरू नये कारण ते ऍसिडिक असते.
हळद
हळद वापरल्याने हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.
लवंग
लवंगमध्ये अॅंटिबॅक्टेरिया हे गुणधर्म असल्याने पिवळेपणा घालवण्यास मदत होते.
भरपूर पाणी प्या
पाण्यामुळे तोंडातील लाळ तयार होते, ज्यामुळे दातांवरील डाग कमी होतात.
डॉक्टरांचा सल्ला
दातांच्या पिवळेपणाचे कारण गंभीर असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.