Washim Railway News | नांदेड- वाशीम- कुर्ला रेल्वे मंगळवारी धावणार!

अखेर खासदार संजय देशमुख यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यास यश
Washim Railway News | नांदेड- वाशीम- कुर्ला रेल्वे मंगळवारी धावणार!
Published on
Updated on

अजय ढवळे

वाशीम : जिल्ह्यासह मराठवाडा आणि विदर्भातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खासदार संजय देशमुख यांनी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, बहुप्रतिक्षित नांदेड–वाशीम–कुर्ला विशेष रेल्वे सेवा येत्या मंगळवारपासून सुरू होणार आहे.

Washim Railway News | नांदेड- वाशीम- कुर्ला रेल्वे मंगळवारी धावणार!
Pune Varanasi Amrit Bharat train: पुणे-वाराणसी ‘अमृत भारत’ रेल्वेला मंजुरी; पुणे-जबलपूर गाडी झाली नियमित

या रेल्वे सेवेच्या प्रारंभामुळे मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार असून, वाशीम जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या रेल्वे गाडीसाठी ६ ऑगस्ट २०२४ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री यांची प्रथम भेट घेऊन नांदेड ते कुर्ला ही बंद असलेली रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यवतमाळ वाशीम लोकसभाचे खासदार संजय देशमुख यांनी रेल्वे मंत्री यांचे कडे केली होती. त्यानंतर ३१ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा एकदा रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन मागील तीन वर्षांपासून बंद असलेली नांदेड–कुर्ला ट्रेन तातडीने सुरू करण्याची विनंती करण्यात आली.

Washim Railway News | नांदेड- वाशीम- कुर्ला रेल्वे मंगळवारी धावणार!
Bullet Train: मुंबई-पुणे अवघ्या ४८ मिनिटांत! बुलेट ट्रेनमुळे कमी अंतराची विमान सेवा संपुष्टात येणार; रेल्वे मंत्र्यांचा इशारा

१९ मार्च २०२५ रोजी , चेअरमन, रेल्वे बोर्ड यांची भेट घेऊन ट्रेन सुरू करण्यासाठी सविस्तर पाठपुरावा करण्यात आला. पुन्हा ४ जून २०२५ रोजी रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांची भेट घेऊन नांदेड–कुर्ला रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. ४ डिसेंबर २०२५ रोजी लोकसभेत नांदेड–कुर्ला ट्रेन सुरू करण्यासाठी जोरदार आवाज उठवत या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले. १० फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा एकदा संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन नांदेड–कुर्ला रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. तसेच, १६ एप्रिल २०२६ रोजी रेल्वे प्रशासन व महाप्रबंधक स्तरावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने, या गंभीर विषयावर लोकसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल करून रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

Washim Railway News | नांदेड- वाशीम- कुर्ला रेल्वे मंगळवारी धावणार!
Mumbai Local Train: CSMT स्टेशनला अनर्थ टळला; दोन लोकल आमनेसामने, स्टेशन मास्तर निलंबित, वाहतुकीची सद्यस्थिती वाचा

सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर यश मिळाले असून, आता नांदेड–कुर्ला व्हाया वाशिम रेल्वे सेवा लवकरच पुन्हा प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे. ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने मराठवाडा, विदर्भ व मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news