वाशिम येथे आमदार राजेंद्र पाटणी यांना निरोप देण्यासाठी लोटला जनसमुदाय | पुढारी

वाशिम येथे आमदार राजेंद्र पाटणी यांना निरोप देण्यासाठी लोटला जनसमुदाय

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वाशिम शहरातील जवाहर कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घरून शनिवारी अंत्ययात्रा निघाली. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.

पाटणी यांनी शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरू केला. १९९७ ते २००३ या कालावधीत ते शिवसेनेकडून विधान परिषद सदस्य होते. तसेच २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर कारंजातून विजयी झाले होते. २००९ साली त्यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले. मृदू स्वभावाचे, अभ्यासू आमदार अशी त्यांची ख्याती होती. सभागृहात त्यांनी अनेक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण उपाय सुचवले होते. सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते.

हेही वाचा : 

Back to top button