वाशिम: जॅक डोक्यात घालून मेहुण्याकडून दाजीचा खून | पुढारी

वाशिम: जॅक डोक्यात घालून मेहुण्याकडून दाजीचा खून

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : दारु सोडविण्यास नेत असताना दाजीने केलेल्या हल्ल्याला प्रतिउत्तर देताना मेव्हण्याने जॅक व कोयत्याने वार करुन दाजीचा निर्घृण खून केला. ही घटना मालेगाव तालुक्यातील झोडगा गावानजीक आज (दि.२१) सकाळी ११.३० वाजता घडली.
सुभाष डिगांबर मापारी (रा. बोरी मापारी) असे मृत दाजीचे नाव आहे. या प्रकरणी मेहुणा नामदेव शिवाजी भुसारी (वय ३२, रा. किनखेडा, ता. जि. वाशीम) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी मेहुणा नामदेव भुसारी हे दाजी सुभाष मापारी यांना वाशीम बसस्थानकावरून दारू सोडविण्यासाठी बाहेरगावी घेऊन निघाले होते. यावेळी सुभाष याने नामदेव यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांने नामदेव याच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केला. प्रत्युत्तरादाखल नामदेव याने सुभाषच्या डोक्यात गाडीतील जॅक घातला. त्यानंतर सुभाषच्या हातातील कोयता हिसकावून घेऊन त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्याच्या नाल्यात टाकून दिला.
पुढील तपास मालेगावचे ठाणेदार संजय चौधरी, पीएसआय राहुल धोत्रे करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button