

वर्धा : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना तब्बल ६ कोटी ७१ लाख ९५ हजार ३५९ रुपये दंड आकारला. जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान जिल्हाभरात ही कारवाई करण्यात आली असून कारवाईने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भरली.
वर्धा शहरामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण, अपघात संख्या आदी आवाहनेदेखील आहे. प्राणांकित अपघात संख्या कमी होण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा सातत्याने प्रयत्न करत आहे. अनेकवेळा नियमित तपासणी सोबतच वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने मोहीमदेखील राबवण्यात येते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना शिस्त लावन्याकरिता वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ मध्ये वाहतूक नियमांचे उललंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे ११४ प्रकरणे, हेल्मेट न वापरणे २६९८ प्रकरणे, सीट बेल्ट न वापरणे ६५२ प्रकरणे, अल्पवयिन विद्यार्थी यांनी वाहन चालवीने ७७ प्रकरणे, ड्राइव्हिग लायसेन्स सोबत न बाळगणे ३२६०२ प्रकरणे, सार्वजनिक रोडवर वाहन उभे थांबवून ठेवणे १४७८९ प्रकरणे, ट्रिपल सीट वाहन चालवीने ६०४७ प्रकरणे, प्रेशर हॉर्न १७४ प्रकरणे, प्रेशर हॉर्न वाजवीने २७५ प्रकरणे, गणवेश न घालता ऑटो चालवीने २३० प्रकरणे, परमिटपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे ५१६७ प्रकरणे, नो इंट्री मध्ये आवजड वाहन चालवीने ७४३ प्रकरणे, दारू पिऊन वाहन चालवीने १८९ प्रकरणे, विना इन्शुरेन्स वाहन २८४ प्रकरणे तसेच इतर मोटार वाहन कायदा उल्लंघन २८८३३ प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत.
अपघात होऊ नये याकरिता सर्वांनी वाहतूक नियमाचे पालन करावे व वर्धा जिल्हा अपघातमुक्त करण्यास वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केले.