

वर्धा : वर्धा नदीपत्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणार्यांवर पुलगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वर्धा नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर उपविभागीय पोलिस अधिकार्यांनी मोहीम राबविली. उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव डॉ. वंदना कारखेले यांनी पोलिस अंमलदार यांच्यासह आपटी शिवारात नाकाबंदी केली. त्यावेळी वाळूची अवैध वाहतूक करताना ट्रॅक्टर मिळून आले. पोलिसांनी ट्रॅक्टर, वाळूसह ६ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले, पोलिस अंमलदार रामदास दराडे, प्रवीण घनमोडे, भूषण हाडके, शुभम कावळे यांनी केली.