

Tuberculosis Control Maharashtra
वर्धा : राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या निर्देशांकात अतिजोखिमेच्या लोकांची तपासणी करण्याच्या कामात राज्यातून वर्धा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्षयरोग उपक्रमात जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत केलेल्या कामाच्या मुल्यांकनावर आधारित हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंमत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटील यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्याला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात 11 टुनेट, 3 सीबीनेट, 11 एक्स रे, 43 मायक्रोस्कोपी सेंटर उपलब्ध आहेत. क्षयरोगाचे निदान व उपचार मोफत केल्या जाते. क्षयरोग औषधोपचार, पर्यवेक्षण, पाठपुरावा, शासकीय सेवेची मदत तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामपंचायतस्तरावर आरोग्य विभागतील अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका यांच्याद्वारे उपManwath Municipal Politics : मानवतला स्थायी व विशेष समिती सभापतीच्या निवडीमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा, विरोधक गैरहजरलब्ध केली जाते.
जिल्ह्यात सन 2025 मध्ये 2 लाख 50 हजार 972 नागरिकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहेत. त्यामध्ये 1 हजार 657 क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. अतिजोखिमेच्या नागरिकांचे 28 हजार 218 एक्स रे व 14 हजार 262 नॅट टेस्टींग करण्यात आले आहे.
पोषण आहारासाठी क्षयरुग्णांना दरमहा एक हजार रुपये बँक खात्यामध्ये औषधोपचार संपेपर्यंत दिले जाते. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत संस्था, उद्योग समूह, दानशुर व्यक्ती, निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना पोषण आहार किटची मदत करत आहे. नयारा एनर्जीने 792 क्षयरुग्णांना तीन वर्षाकरिता दत्तक घेऊन त्याकरिता 75 लाख निधी दिला आहे. या अभियानात निक्षय मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळे मोठा हातभार लाभला आहे.