Wardha Crime News | मोटारसायकल चोरीचे दहा गुन्हे उघडकीस

Motorcycle Theft | वर्धा पोलिसांनी केली टोळी जेरबंद
Wardha Crime News
File Photo
Published on
Updated on

वर्धाः मोटारसायकल चोरी करणार्‍या टोळीस जेरबंद करत पोलिसांनी मोटारसायकल चोरीचे तब्बल दहा गुन्हे उघडकीस आणले. पोलिसांनी ९ मोटारसायकल, १ मोपेड जप्त केली. ही कारवाई वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.

पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणाचा तपास करताना आरोपी म्हसाळा येथील असल्याची गोपनीय माहिती मिळाली. चोरीतील मोटरसायकल अमरावती जिल्ह्यात एका गावात ठेवल्याचे समजले. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे शोध पथकाने काशीखेड तहसील धामणगाव (रेल्वे) जिल्हा अमरावती येथे जाऊन अक्षय उर्फ गौरव पद्माकर काळे (वय २६) रा. काशीखेड याला ताब्यात घेतले.

image-fallback
मोहोळ : मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद

त्याने तीन मोटरसायकलशुभम फुलझले याच्यासह चोरी केल्याची माहिती पुढे आली. एक मोटर सायकल अमोल कैकाडी याच्या हस्ते नेर येथे विकण्याकरता पाठवल्याची माहिती पुढे आल्यावरून चोरी गेलेली मोटरसायकल व अमोल कैकाडी याला ताब्यात घेतले. या मोटारसायकली अक्षय काळे, शुभम फुलझले यांनी चोरी करून विकण्याकरता दिल्याचे पुढे आले. पोलिसांनी अमोल कैकाडी, अक्षय काळे यांच्यासह वर्धेला येऊन साईनगर मसाळा येथून शैलेश मधुकरराव फुलझले, शुभम मारोतराव हातेकर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौघांनाही अटक केली. आरोपींची पोलिस कोठडी मिळाली.

Wardha Crime News
मोटारसायकल चोरटे जेरबंद; चोरीच्या 7 दुचाकी हस्तगत

पोलिसांनी ९ मोटरसायकल आणि १ मोपेड गाडी असा २ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागरकुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या निर्देशाप्रमाणे ठाणेदार पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, पोलीस नाईक नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार यांनी केली. आरोपींकडून पोलीस स्टेशन वर्धा शहरचे मोटरसायकल चोरीचे ६ गुन्हे, पोलीस स्टेशन जीआरपीएफ धामणगाव रेल्वे २ आणि नागपूर शहरचे २ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news