

वर्धा : कारंजा (घाडगे) जवळच्या शेत शिवारात वीज पडून दोघा शेतमजूरांचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास घडली. रितेश मोरेश्वर सरोदे (वय २२) आणि राजेश ताराचंद सरोदे (वय १६) अशी मृतांची नावे आहेत.
कारंजा (घाडगे) पासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात कपाशीची लागवड सुरू होती. कारंजा (घाडगे) येथील खर्डीपुरा परिसरातील रहिवासी रितेश सरोदे आणि राजेश सरोदे हे दोघे शेतमजूर शेतात कपाशी लागवडीसाठी गेले होते. दुपारच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने दोघेही शेतातील झाडाखाली उभे होते. यावेळी अचानक वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास कारंजा पोलिस करीत आहेत.