वर्धा जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायती टीबी मुक्त
वर्धा : केंद्र शासनाने 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण आखले असून जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे. या धोरणाअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त करण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
टीबीमुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. या ग्रामपंचायतींचे पडताळणी करुन पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या जाहीर केली. या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्ह्यात शासकीय अधिकारी, डॉक्टर आदींचा एक रुग्ण सहाय्यता समुह तयार करण्यात आला होता. या उपक्रमामध्ये टीबीमुक्त ग्रामपंचायतींसाठी क्षयरोगाचे निकष पुर्ण केलेल्या ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. याकरिता वार्षिक 1000 यामध्ये एक किंवा एकापेक्षा कमी (निरंक) रुग्ण असावा, वार्षिक 1000 लोकसंख्येमध्ये कमीत कमी 30 टिबी संशयित क्षयरुग्ण शोधुन त्यांची थुंकी नमुन्याची तपासणी केली. डीएसटी तपासणी झालेली असावी त्याचे प्रमाण 60 टक्के असावे, 100 टक्के निक्षय पोषण योजना व पोषण आहार दिलेला (निक्षय मित्र) असावा अशा निकषायोल ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. क्षयरोग दुरिकरण करण्यासाठी या टि.बी मुक्त ग्रामपंचायत उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टिबीमुक्त असल्यास कांस्य, दुसऱ्या वर्षी टिबीमुक्त असल्यास रजत आणि तिसऱ्या वर्षी टिबीमुक्त राहिल्यास सुर्वण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
वर्धा जिल्ह्याअतंर्गत 2023 मध्ये एकुण 40 ग्रामपंचायतींची निवड टिबीमुक्त ग्रामपंचायत म्हणुन करण्यात आलेली आहे. या ग्रामपंचायतीना व निक्षय मित्र, टि. बी. चॅम्पियन, आ. एम. ए. यांना महात्मा गांधी यांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्ती पत्रक देउन गौरविण्यात आले. आपल्या क्षेत्रातील क्षय रुग्णांना ग्रामपंचायत निधी मधून निक्षयमित्र बनवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केले. स्व. सिंधुताई सपकाळ सभागृह जिल्हा परिषद वर्धा येथे टीबीमुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा कार्यक्रमाचे उद्वघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते करण्यात आले.