क्रीडा स्पर्धातून शहरी-ग्रामीण दरी कमी व्हावी : नितीन गडकरी

 नितीन गडकरी
नितीन गडकरी

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : नागपूर येथील एकल युथ क्लब द्वारा 'एकल अभियान'अंतर्गत आयोजित क्रीडा स्पर्धेचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानकापूर भागातील विभागीय क्रीडा संकुल येथे उद्घाटन केले.

५ आणि ६ नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातून ग्रामीण भागांतील १४ वर्षांखालील ३५० खेळाडू सहभागी झाले आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने आजही अंधारात असलेल्या या वनवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतील. यामुळे या भागांतील युवकांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी एकल अभियानाचे राष्ट्रीय महामंत्री माधवेंद्र सिंह, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त ठाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news