चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यात नर वाघ जेरबंद

चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यात नर वाघ जेरबंद

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा: सिंदेवाही तालुक्यात शॉप शूटर्सच्या साह्याने डार्ट मारून एका पट्टेदार वाघाला जेरबंद करण्यात आले. महिनाभरापूर्वी नवेगाव, लोनवाही परिसरातील रघुनाथ नारायण गुरनुले यांच्यावर हल्ला करून ठार केले होते. तेव्हापासून हा वाघ सरडपार, नवेगाव लोन, चिटकी व जाटलापूर परिसरात वावर करीत होता. या मार्गावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत होता. या बाबत बऱ्याच तक्रारी वनविभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे या वाघावर वन विभागाने पाळत ठेवली होती. त्याला जेरबंद करण्यासाठी कारवाई सुरू होती.

या परिसरातील आणि या मार्गाने ये- जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका लक्षात घेता आणि मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता नर वाघाला सिदेंवाही वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र क्र. 1281 मध्ये ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व शूटर अजय मराठे यांनी वाघाला डार्ट करून बेशुद्ध केले. आणि काही वेळाने पिंजऱ्यात बंद करण्यात आले.
ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक एम. बी. चोपडे, वनक्षेत्रपाल व्ही. ए. सालकर, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पचे ए. डी. कोरपे, ए. एम. दांडेकर, नूर सय्यद व राकेश अहुजा यांचे उपस्थितीत करण्यात आली. जेरबंद करण्यात आलेला वाघ वय अंदाजे तीन ते चार वर्षे वयाचा आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय व बचाव केंद्र, नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news