अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालये बंद! जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आदेश

File Photo
File Photo

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी (दि. १८) ग्रामीण भागात व शहरात मुसळधार पाऊस झाला. बुधवारीही भारतीय हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविल्याने बुधवारी (19 जुलै) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाने सुटी घोषीत केली आहे. त्यामुळे शाळा  व महाविद्यालये आज (दि. १९ ,बुधवारी) बंद राहतील.

भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 18 व 19  जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली होती. हवामान खात्याच्या अंदाजनुसार आज  मंगळवारी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळला. जिल्हृयातीली नदी नाले, तलाव तंडूब भरले आहेत. काही तलावांचा ओव्हर फ्लो निघाला आहे. आज मंगळवारी पहाटेपासून दिवसभर जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतामध्येही प्रंचड पाणी साचले आहे.  नुकतेच झालेले रोवणी सडण्‌याच्या मार्गावर आहेत. तर अतिपावसामुळे रोवणी हंगाम शेतकऱ्यांना बंद ठेवाला लागला आहे. आजही (दि. १९)  हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. अतिवृष्टीदरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ याकरिता  जिल्हा प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालये आज (दि. 19 जुलै) बंद राहणार आहेत. या याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केले आहेत.

मंगळवारी दिवभर कोसळत असलेल्या पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत 07172- 251597 आणि 07172- 272480 या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे..

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news