वरोरा येथे लोखंडी प्रेक्षक गॅलरी कोसळली; ७ जण गंभीर

वरोरा येथे लोखंडी प्रेक्षक गॅलरी कोसळली; ७ जण गंभीर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे सूरू असलेल्या आमदार चषक स्पर्धेत प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने ७ जण गंभीर तर २५ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. शनिवारी (४ डिसेंबर) त्री नऊ वाजताच्या सुमारास उद्घाटन समारंभ पार पडला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच कबड्डी सामन्यावेळी ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्यांना चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात तर किरकोळ जखमी झालेल्यांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

वरोरा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारपासून या स्पर्धेला सुरूवात झाली. उद्घाटन समारंभ असल्याने कबड्डी सामने बघण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री 9 वाजता उद्घाटन पार पडले. यावेळी शेकडो नागरिक लोखंडी प्रेक्षक गॅलरीत बसले होते.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन होताच नगर परिषद लगत असलेली प्रेक्षक गॅलरी कोसळली आणि मैदानात एकच गोधळ उडाला. त्यानंतर नागरिकांची पळापळ सुरू झाली. ही गॅलरी लोखंडी असल्याने त्यावर बसलेल्या प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याचे समजते. त्यापैकी ७ जण गंभीर जखमी झाले आहे.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news