पुण्यातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : नीलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे
नीलम गोऱ्हे
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरातील औंध परिसरात शुक्रवारी (दि. २३) एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेतील सर्व आरोपींवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करा, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

गुरूवारी (दि.२९) स्त्री आधार केंद्राच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात त्या म्हणतात, 'सदर घटनेचा तपास करुन संबंधित मुलीस न्याय मिळवून देण्यात यावा. या घटनेचा तपास अधिक जलदगतीने करावा. आरोपींना जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करावा. संबंधीत अल्पवयीन मुलीला समुपदेशनाची आवश्यकता असल्याने समुपदेशन मिळवून द्यावे. या पीडितेला मनोधैर्य योजने अंतर्गत मदत मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.' याबाबतची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news