Anant Ambani-Radhika Merchant engagement : मुकेश अंबानींच्या लहान मुलाचा झाला साखरपुडा! | पुढारी

Anant Ambani-Radhika Merchant engagement : मुकेश अंबानींच्या लहान मुलाचा झाला साखरपुडा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Anant Ambani-Radhika Merchant engagement : अंबानी कुटुंबात आणखी एक आनंदाचा क्षण आला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चेंट हिच्याशी साखरपुडा झाला आहे. लवकरच दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. दोघांच्या साखरपुड्याचा फोटो समोर आला असून राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात हा साखरपुडा झाला.

अनंत आणि राधिका यांचे लग्न कधी होणार, याबाबत अद्याप तरी कुठली माहिती समोर आलेली नाही. अनंत आणि राधिका बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखतात. राधिका अंबानी यांच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित असते. आता लवकरच ती अंबानी कुटुंबाची लहान सून होणार आहे.

साखरपुड्याचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट सोबत पोज देताना दिसत आहेत. या साखरपुड्यावेळी अंबानी आणि मर्चंट कुटुंबीय उपस्थित होते. परिमल नाथवानी यांनी ट्वीट केलेल्या फोटोत अनंत आणि राधिका खूप सुंदर दिसत आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा राजस्थानमध्ये साखरपुडा झाला. नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात या जोडप्याचा साखरपुडा झाला आणि आनंदाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत सामील झाले. अनंत आणि राधिका थांबल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक परिमल नाथवानी यांनी ट्विट करून दोघांचे अभिनंदन केले आहे. ट्विटमध्ये या दोघांच्याही साखरपुड्याचा फोटो दिसत आहे. अनंतने गुलाबी रंगाचा कुर्ता घातला आहे आणि राधिका बेबी पिंक लेहेंगा आणि दागिन्यांमध्ये सुंदर दिसत आहे. (Anant Ambani-Radhika Merchant engagement)

हेही वाचलंत का?

Back to top button