चंद्रपूर : ग्रंथदिंडीने चांदानगरी दुमदुमली; विदर्भ साहित्य संमेलनाला सुरूवात

चंद्रपूर : ग्रंथदिंडीने चांदानगरी दुमदुमली; विदर्भ साहित्य संमेलनाला सुरूवात
Published on
Updated on

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : दिवंगत मनोहरराव म्हैसाळकर स्मृती प्रित्यर्थ चंद्रपुरातील अग्रणी शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संमेलन आयोजित केले आहे. ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनास आज, शुक्रवारी (दि. १६) ग्रंथदिंडीने थाटामाटात सुरुवात झाली.

आज सकाळी स्थानिक सावरकर चौकातून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थ्यासह साहित्यिक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीचे पूजन होऊन संमेलनाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. फेटे बांधलेले विद्यार्थी, नऊवारीतील विद्यार्थिनी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बँड पथकामुळे अवघा आसमंत दुमदुमून गेला होता.

मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. ज्ञानेश्वरी, भारतीय संविधान, ग्रामगीता यासह अनमोल ग्रंथ पालखीत ठेवण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. वि. स. जोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाधिकारी विवेक गौडा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, प्राचार्य पी. एम. काटकर, इरफान शेख व आदी मान्यवर उपस्थित होते. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि लेझीम पथक सर्वांचे आकर्षण ठरले.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news