अमरावती जिल्ह्यात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार

संग्रहित
संग्रहित

अमरावती, पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात १७ डिसेंबर रोजी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले. रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षीय बालिकेवर शेतात अत्याचार करण्यात आला, तर शेंदुरजना घाट ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.

बोर व मध देण्याचे आमिष दाखवून एका १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ डिसेंबर रोजी उघडकीस आला. पीडित मुलगी ही आजी सोबत शेतातील तुरीच्या शेंगा तोडण्याकरिता गेली होती. दरम्यान ती मुलगी शेतात गेली असता आरोपी बबलू हरणेने तिला बोर व मध देतो, असे म्हणून अत्याचार केला. हा प्रकार पाहून पीडितेच्या आजीने रहिमापूर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुध्द तक्रार नोंदविली.

अन्य एका घटनेत शेंदूरजना घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीवर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याची  घटना पुढे आली आहे. १६ वर्षीय मुलगी घरी हजर असताना, तिला गावातील एक महिलेने सांगितले की, मनिष सदापूरेने बोलाविले. त्यामुळे ती मुलगी मनिषच्या घरी गेली. त्यावेळी आरोपी तरुणाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. परंतु, आठ दिवसांनी गावातीलच आणखी एका तरुणाने त्या मुलीला बोलायचे असल्याचे सांगून दुचाकीवर बसून शेतात नेले. याबाबत मुलीने जाब विचारला असता, गेल्या आठवड्यात तू कोणासोबत काय केले, ही गोष्ट सर्वांना सांगेल, असे धमकावरून त्या तरुणाने सुध्दा मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

दरम्यान, आणखी एक तरुण तेथे आला आणि त्यानेही पीडितेवर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर तुला बघून घेईन, अशी धमकी त्या तरुणांनी दिली. त्यामुळे पीडित मुलीने अखेर शेंदुरजना घाट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानुसार आरोपी मनिष सदापूरे (वय २५), अमोल बोके, पियुष डोके, केशव वंजारी, हर्षल मनोहर गोत्रे, कपिल तिडके व एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news