

जत ; पुढारी वृत्तसेवा : बाज( ता.जत) येथे ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदान प्रक्रियेदरम्यान जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी येथील १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनशक्ती ग्रामविकास आघाडी पॅनेलच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान करण्यास सांगण्यावरुन हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात दुर्गाप्पा आप्पा ऐवळे (वय ४३ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली.
यातील आरोपी सदाशिव ऊर्फ विकास प्रकाश बंडगर, महानिंग मुकिंदा गडदे, अक्षय महानिंग गडदे, अविराज महानिंग गडदे, विश्वास विलास बंडगर, सुनिल विलास बंडगर, राहुल बिरु गडदे, दाजी राजु गडदे, प्रकाश तानाजी गडदे, मंगेश सचिन वळकुंडे, सागर शिवाजी गडदे, रावसो महादेव गडदे, विलास दयाप्पा गडदे (सर्व रा. बाज, ता.जत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी महानिंग गडदे आणि इतर १२ आरोपींनी जनशक्ती ग्रामविकास आघाडी पॅनेलच्या कार्यकर्त्याना शिवीगाळ आणि मारहाण केली असल्याची फिर्यादी दूर्गाप्पा ऐवळे यांनी फिर्याद दिली. कलम ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९, सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ च्या सुधारित अधिनियम २०१५ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास उविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शेडगे हे करीत आहेत.
हेही वाचा