नागपुरात आढळला दुर्मिळ ‘क्रेस्टेड सरपेंट ईगल’

नागपुरात आढळला दुर्मिळ ‘क्रेस्टेड सरपेंट ईगल’
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: नागपुरातील एका निवासस्थानी भटकत आलेला क्रेस्टेड सरपेंट ईगल पक्षी आढळून आला आहे. त्याला वाइल्ड लाईफ ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी सुरक्षितरित्या ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटरला पाठविले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करून मग त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.

साधारणतः शहरात किंवा गावांमध्ये क्रेस्टेड सरपेंट ईगल हा पक्षी दिसून येत नाही. हा पक्षी घनदाट अशा जंगलात राहतो. तो साप खातो. साप हे त्याचे आवडते खाद्य आहे. हा पक्षी पाहून आसपासचे नागरिक काहीसे भयभीत पण आश्चर्यचकित झाले होते. मात्र नंतर त्यांना त्या पक्षाचे कुतूहलसुद्धा वाटायला लागलं. त्याला डिहायड्रेशन झालं होतं. तो घाबरलेला होता. त्याच्यावर आता ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी सायंकाळी वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष पंकज बादुले यांना फोन आला. जगजीवन नगर गरोबा मैदानातून अक्षय कांबळे यांनी फोन केला. ते म्हणाले, आमच्याकडं विशिष्ट प्रकारचा पक्षी सापडला. वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटीचे साहील शरणागत, पंकज बादुले, सारंग पेशने, दीपक शर्मा हे कांबळे यांच्या घरी पोहोचले. त्यांना तो पक्षी "क्रेस्टेड सरपेंट ईगल" असल्याचं समजलं. हा पक्षी जखमी अवस्थेत होता. त्याला डिहायड्रेशन झालं होतं. त्यामुळं तो सहज सापडला. जखमी पक्षाला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला पाठविण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. बरा झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news