

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरचे खासदार स्व. बाळु धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथे दुपारनंतर पोहचल्यानंतर लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळपासून जनसागर उसळला. (Balu Dhanorkar Last Time Moment)
दिल्ली येथे खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे रूग्णालयात निधन झाले. त्यांनतर त्यांचे पार्थिव एअर ॲम्बुलन्सने नागपूर मध्ये आणण्यात आले. त्यानंतर दुपारी वरोरा येथे त्यांचे घरी आणण्यात आले. दुपार पासून आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते, चाहत्यांची गर्दी झाली. सायंकाळी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव तथा माजी मंत्री मुकुल वासनिक, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अतिशय जड अंतःकरणाने कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी वरोरा येथे जाऊन दर्शन घेत पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे सांत्वन केले. दुपार पासून त्यांचे घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. घरी पार्थिव आल्याची माहिती सर्वत्र पसरताच नागरिकांनी गर्दी केली. (Balu Dhanorkar Last Time Moment)
हेही वाचा