युवकांनो, कौशल्य आत्मसात करा, स्वावंलबी व्हा : नितीन गडकरी

युवकांनो, कौशल्य आत्मसात करा, स्वावंलबी व्हा : नितीन गडकरी

Published on

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : आपल्या जीवनामध्ये कुठलेही कौशल्य आत्मसात करून त्याचा जीवनात उपयोग करून स्वावंलबी होऊन स्वयंरोजगाराची कास धरावी. त्याचप्रमाणे रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे व्हावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्रशासनाच्या सेवात नव्याने भरती झालेल्या 70 हजार तरुणांना नियुक्तीपत्रं देशातील 43 ठिकाणी दुरदृश्यप्रणालीद्वारे आज प्रदान करण्यात आली. नागपूरच्या धरमपेठ येथील वनामती संस्थेच्या सभागृहात रोजगार मेळ्याअंर्गत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शासकीय नोकरीप्राप्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय महाव्यवस्थापक वैभव काळे उपस्थित होते.

पुढील वर्षात 1 लाख युवकांना मिहानमध्ये रोजगार मिळणार यामुळे नागपूरचे अर्थव्यवस्था सुद्धा निर्माण होईल अशी आशा गडकरी यांनी यावळी व्यक्त केली. रोजगार आणि नोकरी यात फरक असून रोजगारामध्ये आपण जे कौशल्य विकसित केले आहे त्याच्या आधारावर आपण काय करू शकतो याचा आपण विचार केला तर, अनेक नवकल्पना आपल्याला येऊ शकतात असे देखील त्यांनी स्पष्ट केलं. बांबू पासून पांढरा कोळसा निर्मिती संदर्भात त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना बांबूच्या लागवडीपासून रोजगार मिळेल एनटीपीसी सारखे सार्वजनिक उपक्रम क्षेत्र या कोळश्यापासून निर्माण होणाऱ्या पिलेटस्‌ सुद्धा विकत घेत आहेत. गडकरी यांनी सांसद आदर्श ग्राम पाचगाव येथे टाकाऊ कपड्यापासून, चिंध्यापासून उत्तम गालीचे तयार करणाऱ्या प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली . या प्रशिक्षणातून महिला स्वयंरोजगारांच्या माध्यमातून स्वतःचा उद्धार करत असल्याचे त्यांनी सांगितलं.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिनिधिक स्वरूपात 5 जणांना नियुक्ती पत्राचे वितरण केले. एकंदर 239 जणांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ,स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया , पंजाब नॅशनल बँक या राष्ट्रीयकृत बँकेत दाखल झालेले परिक्षावधीन अधिकारी ,सहायक , बँक व्यवस्थापक , मध्य रेल्वे, त्याचप्रमाणे वीएनआयटी नागपूर मध्ये दाखल झालेल्या विविध कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

-हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news