चोर चोरी करण्यासाठी चोरटे नवनवीन युक्त्या वापरत आहेत. घराचा बाहेरील नळ चालू करणे, जेणेकरून पाण्याचा आवाज ऐकून घरातील सदस्य जागे व्हावे व घराचे दार उघडून बाहेर पडावे. व चोर त्याचवेळी घरात घुसून चोरी करू शकेल, अशाप्रकारे विविध युक्त्यां ते चोरी करण्यासाठी वापरत आहे. मागील महिन्यातच महारुद्रनगर येथील अमोल ठाकरे यांच्या घरासमोरून सायंकाळी ४ वाजता चोरट्यांनी त्यांची मोटारसायकल चोरून नेली होती. याच परिसरात भर दुपारच्या सुमारास चोरट्यांनी कृषी केंद्रातील दुकान मालकाचे लक्ष वेधून दुकानातील 35 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या बाबत त्यावेळी पोलीस विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. पोलीस प्रशासनाच्या या ढिसाळ धोरणामुळे चोरट्यांची हिंमत वाढत आहे. या समस्येबाबत पोलीस प्रशासनाने वेळीच काही मोठी पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा चोरीची मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्थानिकांचे मत आहे.