Vijay Wadettiwar | अजितदादांच्या अपघाताची चौकशी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी : विजय वडेट्टीवार

कुणाला मंत्रिपद, उपमुख्यमंत्री पद द्यावे हा त्यांचा अंतर्गत निर्णय
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarPudhari
Published on
Updated on

Ajit Pawar Plane Crash

नागपूर : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे सीआयडी चौकशीपेक्षा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र यावेत का? त्या पक्षात कुणाला मंत्रिपद, उपमुख्यमंत्री पद द्यावे हा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वय पाहता मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र यावे, अशी भावना वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

येत्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते पदाबाबत सरकार नवीन विधेयक आणणार आहे. या विधेयकाला वडेट्टीवार यांनी विरोध करत याची काय गरज आहे, असा सवाल उपस्थित केला. राज्यात उपमुख्यमंत्री पद आहे जे संवैधानिक नाही, पण विरोधी पक्ष नेते पद द्यायचे नाही म्हणून सरकार पळवाटा शोधत आहे. सरकारला हवे तसा कारभार करायचा आहे, विरोध नको म्हणून हे विधेयक आणले जात आहे ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar
Ajit Pawar supporter death | अजित पवारांच्या निधनाचा धक्का; नाशिकमधील कट्टर समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जिल्हा परिषद निवडणूक आणि TET परीक्षेच्या तारखा एकच दिवशी आल्या आहेत. यामुळे शिक्षकांना वेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोगात समन्वय नाही का? असा प्रश्न विचारला असता शिक्षकांना असे वेठीस धरणे हा त्यांचा छळ आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.

चंद्रपूर येथील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना धमकी

समृद्धी महामार्गावर चंद्रपूर येथील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकाची बस थांबवून त्यांना धमकावण्यात आले, हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी त्यांच्याकडे चाकू,तलवार, बंदूक असल्याची माहिती मिळाली पोलिस या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

समृद्धी महामार्गावर घडलेल्या प्रकरणी नेमके कोण होते, कोणी हा हल्ला केला याबाबत अधिकची माहिती नाही पण पोलिस याबाबत तपास करत असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news