Vijay Wadettiwar | शेतकऱ्यांनी सावकारी पाशामुळे किडन्या विकल्या; आरोपींना मकोका लावा: विजय वडेट्टीवार

विधानसभेत लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून राज्यात सावकारांचे राज्य सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला
Maharashtra Mayor Reservation
Vijay Wadettiwar Pudari
Published on
Updated on

Maharashtra Assembly Session

नागपूर : महाराष्ट्रात सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ आली. या किडनी रॅकेटमधील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर 'मोका' अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी (दि.२५) करीत सरकारला धारेवर धरले.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विधानसभेत लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून राज्यात सावकारांचे राज्य सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याकडून एका लाखाच्या कर्जासाठी ७४ लाख सावकाराने वसूल केले. शेवटी ट्रॅक्टर आणि शेती जाऊनही कर्ज फिटत नसल्याने शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ आली.

Maharashtra Mayor Reservation
Vijay Wadettiwar | अजितदादांच्या अपघाताची चौकशी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी : विजय वडेट्टीवार

या पीडित शेतकऱ्याला परदेशात डेटा सेंटरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून पाठवले गेले. वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला मायदेशी परत आणले. या रॅकेटची पाळेमुळे दिल्ली आणि दक्षिण भारतापर्यंत पसरलेली आहेत. यात दिल्लीतील एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा समावेश असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला.

या डॉक्टराला अटक करण्याचे धाडस सरकार दाखवणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री यांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकरणात कायदा कठोर करण्यासाठी सरकार काम करेल असे आश्वासन दिले.

Maharashtra Mayor Reservation
Vijay Wadettiwar | पदासोबतच 1 कोटीची काँग्रेस नगरसेवकांना ऑफर; विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील कर्त्या पुरुषाने आपली किडनी गमावली आहे, ते कुटुंब उघड्यावर पडले आहे. अशा शेतकऱ्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर गृहराज्यमंत्री यांनी या कुटुंबाला सरकार मदत करेल, असे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news