नागपूर : विदर्भवादी झेंड्यासह घुसले विधानभवनात; पोलिसांची उडाली तारांबळ

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणीसाठी आंदोलन
Protest In Vidharbha
विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न करणारे आंदोलकPudhari Photo
Published on
Updated on

विदर्भ राज्य आंदोलन समितीसह इतरही काही संघटनांच्या। कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.10) विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. मागील अनेक वर्षांपासून सातत्याने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी नागपूरसह विदर्भात केली जात आहे. याबद्दल स्वतंत्र आंदोलनही झाले. समितीने आता स्वतंत्र विदर्भासह राज्यातील वाढीव वीजदराला विरोध, विदर्भातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, प्रिपेड स्मार्ट मीटर लावण्याच्या निर्णयाला विरोधासह इतरही मागण्यांसाठी १० ऑगस्टला नागपुरात विधानभवनावर आंदोलनाची घोषणा केली होती.

Protest In Vidharbha
विदर्भ विकास मंडळ मुदतवाढ प्रकरणी हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारले

यासाठी शनिवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपुरात आंदोलन सुरू केले. सकाळपासून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या आंदोलकांच्या मोर्चाला टेकडी रोडवर पोलिसांनी अडवले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाचीमुळे तणाव निर्माण झाला होता.

Protest In Vidharbha
अधिवेशनात विदर्भ दिसावा म्हणून…

दरम्यान, दोन आंदोलकांनी विधान भवनात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा घेऊन तो फडकावण्यासाठी शिरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली. क्रांतीदिनानिमित्त घोषित आंदोलनानुसार गनिमी काव्याने आंदोलकांनी विधानभवन परिसरात शिरण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलकांकडून पोलिसांनी स्वतंत्र्य विदर्भाचा झेंडा जप्त केला. टेकडी रोडवर पोलिसांनी काही विदर्भवादी नेत्यांना ताब्यात घेतले. पोलिस ताब्यात घेत असल्याचे बघत आंदोलक संतापले. पोलीस व आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलांकडून विदर्भ राज्य आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे ..असे नारे लावण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news