नागपूर : महायुतीची चिंता इतरांनी करू नये, एकत्रच लढणार : प्रफुल्ल पटेल

नागपूर : महायुतीची चिंता इतरांनी करू नये, एकत्रच लढणार : प्रफुल्ल पटेल
The Assembly will contest the leadership of Chief Minister Eknath Shinde
महायुतीची चिंता इतरांनी करू नये, एकत्रच लढणार : प्रफुल्ल पटेल File Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा

गेल्या काही दिवसात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परस्पर विधाने केली जात आहेत. महायुतीच्या भवितव्याविषयी उलट- सुलट चर्चा केली जात आहे. मात्र यात काहीही अर्थ नाही, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणूनच विधानसभा लढणार, नंतर मुख्यमंत्री ठरविणार, मात्र मुख्यमंत्री आमचाच होणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.

The Assembly will contest the leadership of Chief Minister Eknath Shinde
Ladakh | लडाखमध्ये मोठी दुर्घटना! JCO सह ५ सुरक्षा जवानांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

या संदर्भात आपली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कालच दिल्लीत चर्चा झाली. निवडणुकीपूर्वीच काय वेगवेगळी विधाने होत आहेत, असे त्यांनीच मला विचारले आणि आपण महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असा विश्वास दिला असेही त्यांनी नागपुरात आज (शनिवार) विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

The Assembly will contest the leadership of Chief Minister Eknath Shinde
खिशात ७० रुपये मग १०० रुपये खर्च कसे करणार? पवारांचा सरकारला सवाल

काल सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला. सर्वांनीच त्याचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्कमपणे काम करीत आहेत. त्यामुळे महायुती आज आणि उद्या देखील मजबुतीने पुढे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news