खिशात ७० रुपये मग १०० रुपये खर्च कसे करणार? पवारांचा सरकारला सवाल

महाराष्ट्रात लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही चित्र असेल
Sharad Pawar
ज्येष्ठ नेते शरद पवार पत्रकार परिषदेत कोल्हापूरमधुन बोलत असताना. File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क :  महाराष्ट्रात लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही चित्र असेल. महाविकास विकास आघाडी हाच चेहरा विधानसभा निवडणुकीतही असेल, आमचा चेहरा हा सामुदायिक असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ते कोल्हापूरमधून आज (दि.२९) बोलत होते. (Sharad Pawar)

काय म्हणाले शरद पवार?

  • महाराष्ट्रात लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही चित्र असेल.

  • महाविकास विकास आघाडी हाच चेहरा विधानसभा निवडणुकीतही असेल.

  • नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूक दरम्यानही जास्तीत जास्त सभा घ्याव्यात.

१८ सभा घेवूनही १४ जागांवर भाजपचा पराभव

लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ सभा घेतल्या आणि १४ जागांवर भाजपचा पराभव झाला. सरकारने आमचा धसका घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूक दरम्यानही जास्तीत जास्त सभा घ्याव्यात असा टोला शरद पवार यांनी मोदी यांना लगावला. पुढे बोलत असताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत १५५ विधानसभा मतदारसंघात मविआ आघाडी आहे.

Sharad Pawar
Maharashtra Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प ‘येथे’ डाउनलोड करा

प्रत्यक्षात योणार नाहीत त्या योजना अर्थसंकल्पात

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल येत्या दोन-अडीच महिन्यांत फुंकला जाणार असताना महायुती सरकारने शुक्रवारी (दि.२८) आपला शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना महिला, तरुण आणि शेतकरी वर्गावर निधीचा अक्षरशः वर्षाव केला. विविध योजना जाहीर केल्या. यावर बोलत असताना शरद पवार म्हणाले, "

विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात घोषणा केल्या आहेत. या घोषणा कधीही प्रत्यक्षात येणार नाहीत. प्रत्यक्षात योणार नाहीत त्या योजना अर्थसंकल्पात आहेत. अर्थसंकल्पातील योजना कशा अंमलात येणार यावर शंका आहे. जर खिशात ७० रुपये मग १०० रुपये खर्च कसे करणार? असाही सवाल शरद पवार यांनी सरकारला केला. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news