Ladakh | लडाखमध्ये मोठी दुर्घटना! JCO सह ५ सुरक्षा जवानांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

नदी ओलांडण्याच्या सरावादरम्यान पाण्याची पातळी अचानक वाढली
Ladakh
लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात नदी ओलांडताना पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात शनिवारी पहाटे नदी ओलांडण्याच्या सरावादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे मोठी दुर्घटना घडली. या घटनेत कर्तव्यावर असलेल्या ५ लष्करी जवानांचा मृत्यू झाला. लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागातील मंदिर मोड येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) टी-७२ टँकला अपघात झाला. शनिवारी पहाटे झालेल्या या दुर्घटनेत एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ)सह ५ जवानांचा मृत्यू झाला.

टी-७२ टँक प्रशिक्षण मोहिमेवर होती. त्यादरम्यान नदी ओलांडताना ही दुर्घटना घडल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Ladakh
लडाख ते अरुणाचल… चीन सीमेवर ‘गरुड’चा पहारा

नेमकं काय घडलं?

टी-७२ टँक प्रशिक्षण मोहिमेवर होती. त्यादरम्यान नदी ओलांडताना ही दुर्घटना घडल्याची माहिती सुत्रांनी दिली. या युद्धाभ्यासादरम्यान नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक उंचावरील भागातील ढगफुटीमुळे वाढला. सूत्रांनी पुढे सांगितले की, "एक टँक अचानक पुरात अडकली. त्यात ५ जवानांचा मृत्यू झाला." या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा समावेश आहे.

पाचही मृतदेह सापडले

दौलत बेग ओल्डी भागात नदी ओलांडण्याच्या सरावादरम्यान झालेल्या दुर्घटनेत एक जेसीओ आणि ४ जवानांसह ५ भारतीय लष्करी जवानांचा मृत्यू झाला आहे. पाचही मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चीनचे ९० टक्के सैनिक लडाख सीमेवरून माघारी

T-72 टँकमधून नदी ओलांडताना पाण्याचा प्रवाह वाढला

सुरक्षा जवान प्रशिक्षण मोहिमेवर होते आणि लेहपासून १४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिर मोडजवळील त्यांच्या T-72 टँकमधून नदी ओलांडत होते. यावेळी नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुर्घटना घडली, असेही पुढे सुत्रांनी सांगितले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून दुःख व्यक्त

दरम्यान, लडाखमधील दुर्घटनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केले आहे. ''लडाखमध्ये नदी ओलांडताना झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आपल्या पाच शूर भारतीय सैन्याच्या जवानांना प्राण गमवावे लागल्याने खूप दुःख झाले. आमच्या शूर सैनिकांनी देशासाठी बजावलेले कर्तव्य आम्ही कधीही विसरणार नाही. शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. या दुःखाच्या काळात देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.'', असे राजनाथ सिंह यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news