टाकळघाट येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

रिलायन्स रेल्वे लाईनच्या पुलाखाली आढळला मृतदेह

Death of Youth
कान्होलीबारा रोडवरील रिलायन्स रेल्वे लाईनच्या पुलाखाली युवकाचा मृतदेह आढळून आला. File Photo

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत कान्होलीबारा रोडवरील गंधारे यांच्या शेताजावळील रिलायन्स रेल्वे लाईनच्या पुलाखाली एका युवकाचा मृतदेह आढळून आला. ही हत्या की आणखी काय? याविषयीचे गूढ वाढले आहे. लक्की उर्फ रोहन सुनील सूर्यवंशी (वय २८, रा. टाकळघाट) असे या मृत तरुणाचे नाव आहे.


Death of Youth
नागपूर : महायुतीची चिंता इतरांनी करू नये, एकत्रच लढणार : प्रफुल्ल पटेल

बुधवारी रात्री घरातून निघून गेला होता

याबाबत अधिक माहिती अशी की, रोहित हा बुधवारी रात्री ८ वाजता आंघोळ करून बाहेर गेला, मात्र परतला नाही. त्याच्या घरच्या लोकांनी रात्री १० च्या सुमारास जेवणासाठी फोन केला असता मी नंतर येतो, असे त्यांने सांगितले. त्यानंतरही तो मित्रांसोबत गावात फिरताना दिसला, अशी चर्चा आहे. परंतु, सकाळी माँर्निग वॉकला जाणाऱ्या तरुणांना कन्होलीबारा रोडवरील गंधारे यांच्या शेताजावळील रिलायन्स पुलाखाली रोहन मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.


Death of Youth
नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल, प्रशासन अलर्ट

अंगावर कोणत्याही जखमा नसल्याने गूढ वाढले

त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्याने पोस्टमार्टम अहवालातून मृत्युचे गूढ उकलू शकेल. या घटनेचा तपास ठाणेदार राजू कर्मलवार, एपीआय सुमंतराज भुजबळ, एपीआय राम कोट, पोलीस विनायक सातव, श्रीकांत गौरकर करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news