नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल, प्रशासन अलर्ट

नागपूर विमानतळाला उडवण्याच्या धमकीने खळबळ
Nagpur airport bomb threat email
नागपूर विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकीFile Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पुन्हा एकदा बॉम्बने उडविणार असल्याच्या धमकीचा ईमेल आला आहे. या धमकीमुळे आज (मंगळवार) डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढून कसून तपासणी केली गेली. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात एएआयला पुन्हा बॉम्बची धमकी मिळाल्याने ही खळबळ माजली.

Nagpur airport bomb threat email
Lok Sabha Speaker Election : लोकसभा अध्‍यक्षपदासाठी होणार निवडणूक

हा ईमेल प्राप्त झाल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली असून, ये-जा करणाऱ्या प्रवाशांची, सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. क्यूआरटी, बीडीएस सारी यंत्रणा 24 तास अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

Nagpur airport bomb threat email
Delhi water crisis | दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांची प्रकृती खालावली, आयसीयूत दाखल

गेले काही दिवसात नागपूरसह देशातील इतरही विमानतळांना उडविण्याच्या धमक्‍या देण्यात आल्‍या आहेत. अशा प्रकारचा ईमेल प्राप्त होण्याची गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी देखील देशातील 40 विमानतळांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर सर्व एअर पोर्टसवर सिक्युरिटी अलर्ट दिला गेला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news