

Offensive Remarks Against Saint Gulab Baba: Devotees Outraged, Demand Criminal Action Against Shyam Manav.
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
पुजनीय संत गुलाब बाबा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करून भाविकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी श्याम मानव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आज 'गुलाब बाबा सेवाश्रम'च्या वतीने करण्यात आली.
या संदर्भात सेवाश्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर आदमने यांच्या नेतृत्वाखाली भाविकांनी आज कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले श्रीकांत शिवणकर यांनी डीसीपी राहुल मदने यांच्याकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन श्याम मानव यांच्यावर लवकरात लवकर कडक कायदेशीर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली.
या शिष्टमंडळात वडालकर, चंदू दंदे, अविनाश नाईक आणि सेवाश्रमाचे अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते. महापुरुष, संतांचा वारंवार अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालणे आवश्यक असून, संतांची निंदा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. जर प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असेही यावेळी सांगण्यात आले.