Aapli Bus Nagpur | तीन बस ऑपरेटरच्या विरोधात गुन्हे दाखल होणार; परिवहन समितीच्या बैठकीत निर्णय

३२ लाख ३९ हजार ७१० रुपयांची वसुली करण्याचा निर्णय
Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

Nagpur Municipal Corporation FIR Bus Operators

नागपूर : शहरात आपली बस सेवेचे संचालन करणाऱ्या तीन बस ऑपरेटरच्या ताब्यात असलेल्या बसचे चेसीस तसेच बसमधील साहित्य गहाळ झाल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून तीनही ऑपरेटरसकडून एकूण ३२ लाख ३९ हजार ७१० रुपयांची वसुली करण्याचा निर्णय गुरुवारी (दि.९) परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान मिशन (जेएनयूआरएम) अंतर्गत नागपूर मनपाला शहर बस (आपली बस) सेवेसाठी २३७ बसेस मिळाल्या होत्या. या बसेसचे संचालन करण्यासाठी मनपाने मे. हंसा सिटी बस सर्विसेस, मे. आर. के. सिटी बस सर्विसेस व मे. ट्रॅव्हल टाईम सिटी बस सर्विसेस या तीन ऑपरेटरची नियुक्ती केली होती.

Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal Corporation: नागपूर महापालिकेची तिजोरी कोणाच्या हाती? भाजपमध्येच निर्णयावर संभ्रम

यात हंसा सिटी बस सर्विसेसकडे ७९, आर. के. सिटी बस सर्विसेसकडे ७९ तर ट्रॅव्हल टाईम सिटी बस सर्विसेकडे ७९ बसेस संचालन करण्याची जबाबदारी होती. यापैकी मे. हंसा सिटी बस सर्विसेस यांच्या कडे ४९ मे. आर. के. सिटी बस सर्विसेस यांच्याकडे १५ व मे. ट्रॅव्हल टाईम सिटी बस सर्विसेस यांच्या कडे ५९ असे एकूण १२३ बसेसचे १५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे निर्लेखन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या प्रक्रियेदरम्यान केलेल्या सर्वेक्षणात बसेस चेसीस व बसमधील काही साहित्य गहाळ असल्याचे निर्दशनास आले. यासंदर्भात कंपन्यांनी खुलासा करावा, अशी नोटीस बजावली. परंतु, या तिन्ही ऑपरेटरनी नोटीसला उत्तर दिले नाही.

Nagpur Municipal Corporation
Nagpur municipal Corporation Election: भाजपला पुन्हा लाडक्या बहिणी देणार साथ, काँग्रेसचे हात दाखवून अवलक्षण ?

परिवहन विभागाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून या सर्व बसेसचे मूल्यांकन केले आहे. यानुसार हंसा सिटी बस सर्विसेसकडून १६ लाख ९९ हजार ४९० रुपये, मे. आर. के. सिटी बस सर्विसेसकडून ३ लाख ७७ हजार ९२० तर मे. ट्रॅव्हल टाईम सिटी बस सर्विसेसकडून ११ लाख ६२ हजार ३०० रुपयांची वसुली करण्याचे निश्चित केले आहे. या तिन्ही कंपन्यांनी वसुलीची रक्कम विहित कालावधीत मनपाकडे न भरल्यास आगामी देयकातून ही रक्कम मनपाच्या खात्यात वळती केली जाईल.

सभापती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात बैठकीला समितीचे सदस्य किशोर कुमेरिया, विजय होले, श्रीमती अर्चना पडोळे, श्रीमती प्रमिला मथरानी, श्रीमती मंगला मस्के, श्रीमती रुपाली ठाकूर, श्रीमती पूजा पाठक, शैलेश रामसुंदर पांडे, दिनेश यादव, शकील पटेल यांच्यासह परिवहन व्यवस्थापक डॉ. मेघना वासनकर, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे उपस्थित होते.

Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal Corporation Election | मुख्याध्यापक, प्राचार्यांनी केला ७५ टक्के मतदानाचा संकल्प!

सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीला मान्यता

मनपाच्या परिवहन डेपोमध्ये बस तसेच बस डेपोमधील मालमत्ताची सुरक्षितता लक्षात घेऊन मनपाच्या ७ बस डेपोमध्ये आणि मोरभवन १ व मोरभवन २ येथे ८७ खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली. हे सुरक्षा रक्षक तिन्ही पाळ्यांमध्ये उपलब्ध राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news