

नागपूर - येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, यासाठी नागपूर महानगरपालिकातर्फे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचार्य आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयकांसाठी 'कॅम्पस कनेक्ट' कार्यक्रम वनामती येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात शनिवारी घेण्यात आला. यावेळी सर्वांनी शपथ घेत ७५ टक्के पेक्षा जास्त मतदान करण्याचा निश्चय केला. हा कार्यक्रम महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसूमना पंत यांच्या अध्यक्षतेत पार पडला.
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मतदान करण्यासाठी प्रेरीत करा, आपण सर्वांनी लोकशाहीचा वापर करीत मतदान केले तर ७५ टक्के मतदानाचा टक्का नक्कीच गाठू शकू, त्यामुळे सर्वांनी मतदान नक्की करा असे आवाहन यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसूमना पंत यांनी केले. याप्रसंगी स्वीप समन्वयक डॉ. सुशांत चिमणकर यांनी उपस्थितांना मतदान शपथ दिली.
यावेळी मनपा उपायुक्त व स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे, नागपूर विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना, संचालक श्री.सोपानदेव पिसे, मनपा जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, क्रीडा अधिकारी श्री. पियूष अंबुलकर, स्वीप समन्वयक डॉ. सुशांत चिमणकर, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, मनपा व इतर शाळेचे शिक्षक तसेच एनएसएस आणि एनसीसी स्वयंसेवक, शिक्षण संबंधित संस्था प्रामुख्याने उपस्थित होत्या.
१५ डिसेंबर २०२५ रोजी मतदानाही दिनांक ठरली आणि तेव्हापासून मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे याकरिता आम्ही प्रयत्न सुरु केले. नागरिकांच्या सोयीसाठी आमच्या मनपाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मतदान जागृतीचे विविध व्हिडिओ प्रसारित केले आहेत. तसेच चार उमेदवारांना यावेळी मतदान कसे करायचे आहे ही प्रक्रिया देखील व्हिडिओच्या माध्यमातून प्रचार प्रसार केली आहे. यातून नागरिकांना प्रक्रिया समजण्यास मदत होईल व ते आपले कर्तव्य सुरळीतपणे पार पाडू शकतील असे, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसूमना पंत यांनी सांगितले. तसेच मतदान केंद्रावरील सोयी विषयी त्या बोलल्या. बूथ वर पिण्याच्या पाण्याची सोय, व्हीलचेअर व इतर सुविधा असतील. तसेच दिव्यांग व्यक्तींना व ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी एनएसएस चे स्वयंसेवक व आशा सेविका देखील केंद्रांवर उपस्थित असतील.
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मतदान करण्यासाठी प्रेरीत करा. आपण सर्वांनी लोकशाहीचा वापर केला आणि मतदान केले तर ७५ टक्के मतदानाचा टक्का नक्कीच गाठू शकू, त्यामुळे सर्वांनी मतदान नक्की करा असे आवाहन यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसूमना पंत यांनी केले. सर्वात जास्तीत मतदान होईल व नागपूर पहिल्या स्थानावर येईल असे आवाहन केले. मतदार केंद्र व बूथ जाणून घेण्यासाठी 'मताधिकार अँप' चा वापर करावा असे आवाहन मनपा उपायुक्त व स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी केले.
चांगला समाज घडविण्यात शिक्षकांचे नेहमीच मोठे योगदान आहे. प्रत्येक १८ वर्षावरील नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. आपल्या लोकशाहीचा वापर करून मतदानाचे महत्व प्रत्येक शिक्षकाने विध्यार्थांना सांगावे. मतदानाचे महत्त्व घरोघरी पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना देखील मतदानास प्रेरित करावे. दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्र पर्यंत पोहचण्यात विद्यार्थ्यांनी मदत करावी असे आवाहन स्वीप समन्वयक डॉ. सुशांत चिमणकर यांनी केले.