

Nag Over bridge :
नागपूरच्या अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौक पर्यंतच्या उड्डाण पुलाचे आज लोकार्पण होत आहे. या नवनिर्मित उड्डाणपुलाला काँग्रेसचे दिवंगत नेते 'ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल' असं नाव देण्यात आले आहे. श्रीकांत जिचकार हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते होते. 2.85 किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलाचे आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे.
नागपूर - अमरावती बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ चौक पर्यंत उड्डाणपुलाची लांबी 2.85 किलोमीटर असून, पुलावर एकूण 766 सेगमेंट्स आहेत. मलेशियन तंत्रज्ञाचा वापर करून लॉ कॉलेज चौकात 65 मीटर लांबीचे 250 टन वजनाचे 6 गार्डर्स उभारण्यात आले आहे. या पूल उभारणीसाटी 198 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.