

Nagpur Crime Chain Snatching :
नागपूर शहरात भरदिवसा आता लुटमार चेन स्नैचिंग आणि मोबाइल हिसकावण्याच्या घटना वाढत आहे. यातच अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा चक्क पार्सल देण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आणि भीतीच वातावरण निर्माण झालंय.
अजनी इथं राहणाऱ्या अश्विनी मेश्राम या घरी एकट्या असताना अज्ञात आरोपी डिलीव्हरी बॉच्या वेशात पोहचला. अज्ञात चोरट्याने हेल्मेट घालून पार्सल देण्यासाठी आल्याची बतावणी केली. अश्विनी यांना मुलीने जेवणाचे पार्सल पाठविले असावे, असे वाटलं... त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला. आरोपीने दिलेल्या कागदावर सही करू लागल्या. अचानक आरोपीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले.
या झटापटीत चोरट्याच्या हातात गळ्यातील तीन ग्रॅम सोनेची मंगळसूत्र लागले.... ते घेऊन त्याने पळ काढला. त्याची सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय. अश्विनी यांनी आरडाओरड केली. लोक येईपर्यंत चोरटा फरार झाला. अश्विनी यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.. आरोपीचा सीसीटीव्ही आधारे अजनी पोलिस शोध घेत आहे..