…अन्यथा शेतकरी उद्ध्वस्‍त होईल; अनिल देशमुख यांनी व्यक्‍त केली भीती

file photo
file photo

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा कापसाला भाव नाही, दोन वर्षांपूर्वी साडेतेरा हजार पर्यंत भाव गेले होते. आज हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करत आहेत. कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची हालचाल दिसत नाही. कापूस खरेदी केंद्र सुरू होणार नाही, तोपर्यंत लूट सुरू राहील. ठोस पावले उचलली पाहिजेत, नाहीतर पुढील काळात शेतकरी जीवन संपवतील अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

मविआ सरकार असताना आम्ही शेवटचे बोंड खरेदी केली. कारखानदारांच्या दबावाखाली सरकार पडले. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला पाहिजे. कापसाला चांगला भाव मिळावा. अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं, गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे.

तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्या अशी मागणी त्‍यांनी केली. दरम्यान, फक्त पंकजा मुंडेचं नाही सर्वच आमदार वनवासात आहेत. बाहेरून येऊन आमदार बनतात ते बोलू शकत नाहीत. जेव्हा सत्तेत येईल तेव्हा भाजपला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्‍यांनी यावेळी दिला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news