नागपूर - महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे. थोड्या वेळात तिकडे आणि थोड्या वेळात इकडे अशी सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सर्व मंत्र्यांकडे खासगी विमान, हेलिकॉप्टर आहेत. सगळी परिस्थिती बघता भाजपची आता चिवडा पार्टी राहिली नाही. आता ती बिर्याणी पार्टी झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला.
नागपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकेल अशी परिस्थिती आहे. मला काँग्रेसनी जबाबदारी दिली आहे. त्यासाठी मी नागपुरात काम करीत आहे. काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते कामाला लागले आहेत. 19 वर्षापासून भाजपची सत्ता आहे. विकासाच्या नावावर शहर भकास झाले आहे. कर्जरूपी भुर्दंड नागपूरकरांना भोगावा लागणार आहे. 24 तास स्वच्छ पाणी देऊ म्हणत लुटण्याचे काम भाजपने केले.
उद्धव ठाकरे यांच्या आरोपांबाबत बोलताना मुंबई शहर अडाणीला विकले गेले हे नाकारता येत नाही. नवी मुंबई, मुंबई असेल सगळ्या शासकीय प्रॉपर्टी अडाणीला दिलेल्या आहेत. राज ठाकरे यांनी जे काल सभेत प्रेझेंटेशन मांडले ते गंभीर आहे. भाजपने संपूर्ण देश अडाणीला विकायचा ठरवले आहे. भाजप आपले पाप लपवण्यासाठी हे सर्व करीत आहे.आयटी सेलचा उपयोग चुकीच्या पद्धतीने भाजप करीत आहे. महाराष्ट्रात तीन तिघाडा काम बिघाडा सरकार आहे.
मुंबईत हिंदी बोलतो तो हिंदू नाही. मराठी बोलणारा हे प्रमाणपत्र देणारी भाजप पार्टी आहे का.? हनुमान चालीसा वाचायची की नाही ते भाजप सांगेल काय. यांना कोणी अधिकार दिला. नागपूर विभागात परमात्मा एक सेवक समाज मोठ्या प्रमाणात आहे ते सत्यनारायणाची पूजा करत नाहीत मग त्यांनाही हे हिंदू म्हणणार नाही का. एकंदरीत धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. यानिमित्ताने भाजपाचा असली चेहरा समोर आलेला आहे.
लाडकी बहीण 2100 द्या निवडणुकीच्या तोंडावर महानगरपालिकेच्या भागात राहणाऱ्या महिलांना पैसे देणे एका अर्थाने प्रलोभन आहे. एकीकडे महिलांचा अपमान करीत आहे. महागाईच्या रूपाने हेच पैसे महिलांकडून काढून घेणारे हे बेईमान भाऊ आहेत. खरेतर बोलल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 2100 दिले पाहिजे.
बावनकुळे किती शिकले हे मला माहित नाही. वडपल्लीवार काँग्रेसचे कधी कार्यकर्ता राहिले नाहीत. तो कोणाचा माणूस होता यांनी खरेतर तपासले पाहिजे असा टोला महसूलमंत्री बावनकुळे यांनी केलेल्या टीकेवर लगावला.
अजित पवार यांच्यावर टीकास्त्र
पुणे जमीन गैरवव्यवहार संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकारी जेव्हा चूक करतात तेव्हा ते झोपले होते का ? महागडी जमीन स्वस्तात घेतली असती. याचप्रकारे नागपुरातील सिम्बॉयसिस कॉलेजला चाळीस एकर जमीन दिली आहे. मुलांना, पालकांना 16 लाख रुपये फीस द्यावी लागते. आजही गरिबांसाठी कॉलेज उघडल्याचे सांगितले जाते. मात्र आता लबाडी करीत आहे. राज्यात शासकीय प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात जनतेची लूट होत आहे. मोठ्या प्रमाणात रोष आहे. विलास खरगे यांची समिती बनवली त्या जागी तुकाराम मुंढे यांची समिती बनवायला हवी होती. दूध का दूध आणि का पाणी झाली असते याकडे नाना पटोले यांनी लक्ष वेधले.