Nana Patole Statement | नाना पटोलेंचा आरोप दिल्लीची घटना केंद्राचे अपयश!

दिल्लीत सोमवारी झालेला स्फोट आणि निरपराध लोकांचा मृत्यू हे बिहारच्या निवडणुकीत गुंतलेल्या केंद्र सरकारचे फेल्युअर आहे या शब्दात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेचा निषेध केला.
Nana Patole Statement
Nana Patole(Pudhari File Photo)
Published on
Updated on

नागपूर : दिल्लीत सोमवारी झालेला स्फोट आणि निरपराध लोकांचा मृत्यू हे बिहारच्या निवडणुकीत गुंतलेल्या केंद्र सरकारचे फेल्युअर आहे या शब्दात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेचा निषेध केला.

मोदी सरकारने पहलगाम हल्ल्याचेही राजकारण केले. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने पाकिस्तान आपल्याकडे वाकडी नजर करून बघणार नाही अशी दर्पोक्ती केली. मात्र हा दावा किती फोल आहे हे या घटनेने दाखवून दिले आहे. केंद्राने या घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. भाजप ज्या पद्धतीने 56 इंची सीना, या देशाचे संरक्षण केवळ आम्हीच करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करते मात्र काश्मीर आणि दिल्ली असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा दिसले आहे.

Nana Patole Statement
Nagpur News | आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेसची जरीपटका पोलिसात तक्रार

आम्हाला या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही पण इतक्या आतपर्यंत दहशतवादी येत आहेत हे निश्चितच सरकारचे अपयश आहे. हा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. पुलवामा, पहेलगाम आणि आता दिल्लीच्या घटनेने हे सिद्ध केले आहे. 26/ 11मुंबई हल्ला झाला त्यावेळी दहशतवाद्यांना जागीच कंठस्नान घालण्यात आले याकडे लक्ष वेधले.

निवडणूक लढणे आणि जिंकणे याच विचारात नेहमी सरकार असते. कधीही देशाचा विचार केला जात नाही. बिहारमध्ये गृहमंत्री कुठल्याही सीसीटीव्ही कॅमेराशिवाय विना सुरक्षेत कशासाठी होते याविषयीचा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news