Nagpur Female Bikers | नागपूरच्या 6 महिला बाइकर्सचा ‘क्विन्स ऑन द व्हील’मध्ये सहभाग

मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीचा शुभारंभ भोपाळ येथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आला
Queens on the Wheel
Nagpur Female Bikers Queens on the Wheel Pudhari
Published on
Updated on

Queens on the Wheel

नागपूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मध्य प्रदेश पर्यटन आणि CAC–Allrounder Adventures यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘क्विन्स ऑन द व्हील’ या केवळ महिलांसाठी आयोजित मोटारसायकल मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीचा शुभारंभ भोपाळ येथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आला.

या मोहिमेत देशातील विविध भागांमधून 25 महिला रायडर्स सहभागी झाल्या असून त्यात नागपूरच्या सहा रायडर्सचा समावेश आहे. यात डॉ. प्रियांका श्रीवास, रुक्मिणी पुनवटकर, पल्लवी देशमुख, रुचिका मेघे, मैथिली सिंह व एकता खंते या महिला रायडर्स मध्य भारताचा बाईकवरून शोध घेण्यासाठी निघाल्या आहेत.

Queens on the Wheel
Nagpur News | नागपूर जिल्हा "स्फोटांची राजधानी" होणार का?; अनिल देशमुख यांचा सवाल

या ध्वजवंदन समारंभाला उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार, मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे (MPTDC) व्यवस्थापकीय संचालक इलैया राजा तसेच MPTDC चे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक बेडेकर उपस्थित होते. मोटारसायकलिंगच्या माध्यमातून साहस, आत्मविश्वास आणि महिला सशक्तीकरण साजरे करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.

समारंभानंतर रायडर्स सांची येथे असलेल्या सांची स्तूपाकडे रवाना झाल्या. भारतातील अत्यंत महत्त्वाच्या बौद्ध वारसा स्थळांपैकी एक आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या या ऐतिहासिक स्मारकाला त्यांनी भेट दिली आणि परिसरातील समृद्ध सांस्कृतिक वारसा अनुभवला.

Queens on the Wheel
Nagpur SBL Blast | नागपूर एसबीएल एनर्जी स्फोट : आणखी दोन महिलांचे मृत्यू; मृतांची संख्या 21 वर 

त्यानंतर रायडर्सनी मध्य प्रदेशातील निसर्गरम्य परिसरातून प्रवास करत ऐतिहासिक उदयगिरी गुंफा येथे रात्री मुक्काम केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रायडर्सनी उदयगिरी येथून चंदेरीकडे प्रवास सुरू केला. चंदेरी येथे त्यांनी ‘चंदेरी टेंट सिटी’मध्ये मुक्काम केला. या भेटीदरम्यान सहभागी रायडर्सनी चंदेरीच्या समृद्ध वारशाचा अनुभव घेतला. येथे असलेले ऐतिहासिक किल्ले, मंदिरे तसेच जगप्रसिद्ध चंदेरी साड्याची त्यांनी पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news