

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील एसबीएल एनर्जी कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील गंभीर जखमी आणखी दोन महिलांचे गेल्या 24 तासात मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 21 झाली आहे.
आम्रपाली कालसर्पे यांचे काल रात्री ११ वाजता निधन झाले. आज रोशनी उमाठे या महिला कामगाराचे निधन झाले. ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये दोघांवर उपचार सुरू होते. या घटनेने नागपूर जिल्ह्यातील विविध स्फोटक निर्मिती कंपनीच्या सेफ्टी ऑडिटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विधिमंडळात देखील याविषयी लक्षवेधी चर्चा झाली. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत 15 दिवसापूर्वी ही भीषण घटना घडली.