Nagpur News | सीमापार गेलेली नागपूरची महिला परतणार!

ताबा घेण्यासाठी कपील नगर पोलिस स्‍टेशनचे पथक गेले अमृतसरला
Nagpur  News
Nagpur News | सीमापार गेलेली नागपूरची महिला परतणार!file photo
Published on
Updated on

नागपूर - भारत- पाकिस्तान तणावपूर्ण वातावरणात मध्यंतरी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली कपिल नगर नागपूरची सुनीता जामगडे नामक ३६ वर्षीय महिला आता लवकरच नागपुरात परतण्याची चिन्हे आहेत. 14 मे रोजी ती सीमा ओलांडत असताना तिला ताब्यात घेण्यात आले.

चौकशी करण्यात आल्यावर पाक रेंजर्सकडून बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाकडे तिला सोपविण्यात आले असून तिला ताब्यात घेण्यासाठी कपिल नगर पोलिस स्टेशनचे एक पोलिस अधिकारी आणि दोन महिला पोलिस असे पथक अमृतसरला रवाना झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली. सुरुवातीला दवाखान्यात नर्स म्हणून काम करणारी ही महिला पतीपासून विभक्त झाल्यानंतर घरोघरी फिरून कपडे विक्रीचा व्यवसाय करते.

Nagpur  News
Nagpur News | नागपूरची महिला थेट LOC ओलांडून पाकिस्तानात! ऑनलाईन ओळख झालेल्या धर्मगुरूला भेटण्यासाठी गेल्याचा संशय

काश्मीरच्या कारगिलमधून 12 वर्षीय मुलाला सोडून एलओसी रेषा ओलांडून दुर्गम रस्त्याने ती अशा तणावपूर्ण वातावरणात थेट पाकिस्तानात पोहोचल्याचे उघड झाल्याने शंकाकुशंका व्यक्त झाल्या. मध्यंतरीच्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर तर या घटनेने भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थाची चिंता वाढली. पाकिस्तानातील लोकांच्या ती फोनवर संपर्कात असल्याचे उघड झाल्याने आता नागपुरात ती आणि मुलगा आल्यावर सखोल चौकशी केली जाणार आहे. एका धर्मगुरुला (पादरीला) भेटण्यासाठी सुनीताने हे धाडस यापूर्वीही केल्याचे तपासात समोर आले आहे. इकडे तिची आई नागपुरातील कपिल नगरात चिंतेत होती. यापूर्वी देखील ती अशीच न सांगता बेपत्ता झाली. यावेळी कुत्र्याला दवाखान्यात दाखविण्यासाठी जात असल्याचे सांगून मुलासह घराबाहेर पडली. ती थोडी विमनस्क असून उपचारही सुरू असल्याचे, पोलिस चौकशीसाठी येऊन गेले असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Nagpur  News
Nagpur Teacher Recruitment Scam | शिक्षण घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटींवर, 622 पैकी केवळ 75 शिक्षकांची नियमानुसार नियुक्‍ती

दरम्यान, मुलाला एकटे सोडून मी लवकर येतो असे सांगून तिने मंगळवारी कारगिलच्या सीमाभागातील हंदरमन येथील एलओसी ओलांडली. बराच उशीर झाला तरी ती न परतल्याने स्थानिकांनी लडाख पोलिसांना कळविले आणि मुलाला त्यांच्याकडे सुपूर्द केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news