Nagpur News | नागपूरची महिला थेट LOC ओलांडून पाकिस्तानात! ऑनलाईन ओळख झालेल्या धर्मगुरूला भेटण्यासाठी गेल्याचा संशय

Nagpur woman LOC missing | नागपूरची महिला कारगिलमधून पाकिस्तानात गेली आहे. तिने याआधी दोनदा अमृतसरमधील अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात घुसण्याचा प्रयत्न केला होता.
Nagpur woman LOC missing
Nagpur woman LOC missing file photo
Published on
Updated on

Nagpur woman LOC missing |

नागपूर : नागपूरमधील एक महिला बुधवारी लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील शेवटच्या गावातून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सुनीता जामगडे (वय ४३) असे या महिलेचे नाव असून, ती नागपूरच्या संत कबीरनगर परिसरात राहत होती.

सुनिता १४ मे रोजी आपल्या १२ वर्षीय मुलासोबत काश्मीरला गेली होती. कारगिल बॉर्डरवरील शेवटचे गाव असलेले 'हुंदरमान'मध्ये ती पोहचली. तिथे गेल्यानंतर मुलाला परत येते असं सांगून एकटीच निघून गेली. मात्र ती परत आलीच नाही. स्थानिक लोकांनी मुलाला लडाख पोलिसांच्या स्वाधीन केले. सुनीता ही सध्या बेपत्ता असून, पाकिस्तानच्या सैन्याने तिला ताब्यात घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र गुप्तचर यंत्रणांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात काही स्थानिक नागरिकांनी तिला पाहिलं आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली.

Nagpur woman LOC missing
Pakistan PM on Operation Sindoor : पाकिस्‍तानच्‍या पंतप्रधानांचा 'कबुली'नामा; म्‍हणाले, "मध्‍यरात्री २:३० वाजता .."

पाकिस्तानातील धर्मगुरूला भेटण्यासाठी ओलांडली बॉर्डर!

सुनीताची पाकिस्तानातील एका धर्मगुरूसोबत ऑनलाइन ओळख झाली होती. ती त्याला भेटण्याचा प्रयत्न करत होती. तिने याआधी अमृतसरच्या अटारी बॉर्डरवरून दोनदा पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तिला रोखून परत पाठवले होते. मात्र, यावेळी ती थेट कारगिलमधून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेली.  

नर्स म्हणून करत होती काम

सुनीताची मानसिक स्थिती पूर्णपणे स्थिर नसल्याचेही समोर आले आहे. याआधी ती नागपूरच्या शासकीय मनोरुग्ण रुग्णालयात उपचार घेत होती. काही काळ ती एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती.

सुनीताची आई काय म्हणाली? 

सुनीताची आई निर्मला जामगडे यांनी सांगितले की, मुलाला कपडे घेऊन येतो, म्हणून सुनीता घरातून बाहेर गेली. १२ वर्षाचा नातू हा काश्मीरमध्ये पोलीस ठाण्यात असून सुनीताबाबत स्थानिक कपिलनगर पोलिसांकडून विचारणा करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news