

Pakistan PM on Operation Sindoor : भारताने आमच्यावर हवाई हल्ला केला;पण आम्ही तो हाणून पाडला, अशी वल्गना करणार्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपा ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानाची कबुली दिली आहे. शुक्रवारी ( दि.१६) इस्लामाबादमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना शरीफ भारताने राबवलेल्या धडक मोहिमेमुळे पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानीची कबुलीच दिली.
शहबाज शरीफ म्हणाले की, ७ मेला रात्री २:३० वाजता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी सुरक्षित लाईनवरून मला फोन केला. जनरल मुनीर यांनी त्यांना सांगितले की भारताने नूर खान एअरबेससह काही महत्त्वाच्या ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. पाकिस्तानच्या हवाई दलाने देशात तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा आणि चिनी लढाऊ विमानांवर आधारित आधुनिक उपकरणांचा वापर करून प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे भारताच्या क्षेपणास्त्रांनी त्यांच्या निशाण्यांवर अचूक लक्ष्य केले, असे सांगत त्यांनी पाकिस्तानच्या नुकसानीवर भाष्य केले.
शाहबाज शरीफ यांच्या कबुलीजबाबामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. कारण भारताने ऑपरेशन सिंदूर राबविल्यापासून ते सातत्याने दावा करत होते की, भारतीय हल्ल्यात त्यांचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. तसेच आमचे हवाई दलाच्या तळांना कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र आता भारताकडून झालेल्या नुकसानाची कबुली पाकिस्तान आता हळूहळू जनतेसमोर देत आहे. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय लष्करी दलांनी माहिती दिली होती की त्यांनी पाकिस्तानच्या ८ लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. ऑपरेशन सिंदूरने अचूक लक्ष्य भेदले होते. आताच शरीफ भारतीय लष्कराने दिलेली माहिती अचूक असल्याचे सांगत आहेत.
शहबाज शरीफ यांनी दिलेल्या कबुलीवर भाजपचे नेते अमित मालवीय यांनी 'एक्स'वर म्हटलं आहे की, शरीफ यांची कबुली "ऑपरेशन सिंदूर" या भारताच्या कारवाईची अचूकता आणि धाडस सिद्ध करते. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ स्वतः म्हणतात की लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी त्यांना रात्री २:३० वाजता फोन करून सांगितले की, भारताने नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी हल्ला केला आहे. पंतप्रधानांना अशा प्रकारे मध्यरात्री उठवले जाणे हे ऑपरेशन सिंदूरच्या अचूकतेचे आणि व्याप्तीचे प्रतीक आहे."
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने ऑपरेशन सिंदूर हे भारताने झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तरात भारताने ७ मे रोजी "ऑपरेशन सिंदूर" सुरू केले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान-अधिकृत जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर आणि त्यांच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार आणि ड्रोनद्वारे हल्ल्याचे प्रयत्न झाले. याला भारतानेही तितक्याच सडेतोडपणे प्रत्युत्तर दिले.