नागपूर: विदर्भात उष्ण लहरींसह वादळी वारे वाहण्याचा इशारा

नागपूर: विदर्भात उष्ण लहरींसह वादळी वारे वाहण्याचा इशारा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पुढील दोन दिवस नागपुरसह विदर्भात उष्ण लहरींसह जोरदार वादळी वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवारी देखील वाडी, वर्धा रोड अशा काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. आज (दि.३०) सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे.

उन्हाच्यावेळी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नका, अशा सूचना क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाने विविध संघटना आणि शाळा, महाविद्यालयांना दिल्या आहेत. नागपूरसह विदर्भात सूर्याची दाहकता अधिकच वाढली आहे. मार्च महिन्यातच दुपारी घराबाहेर पडणे नागरिकांना कठीण झाले आहे.

मार्च महिन्यातील तापमानाचे जुने विक्रम यंदाही मोडतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गडचिरोली आणि गोंदिया वगळता विदर्भातील सर्व जिल्हे शुक्रवारी ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले होते. नागपूरमध्ये ४०.२ अंश सेल्सिअसची कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news