नागपूर देशात सर्वात सुंदर शहर होईल : नितीन गडकरी | पुढारी

नागपूर देशात सर्वात सुंदर शहर होईल : नितीन गडकरी

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मी खोटी आश्वासने देत नाही, जे माझ्याकडून शक्य होईल तेच मी बोलतो. पुढील निवडणुकीच्या आधी तुम्हाला नाग नदीतून अंभोरापर्यंत बोटीने घेऊन जाईन. तुम्ही मला मत दिले नाही तरी मी माझे काम करणारच असे वक्तव्य केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि.२९) नागपुरात केले. तसेच नागपूर देशात सर्वात सुंदर शहर होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नागपुरात जैन कलार सांस्कृतिक सभागृहात एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मी नागपुरचा आहे. त्यामुळे मला चिंता नाही, मी निवडून येणारच असा विश्वास आहे. गेल्यावेळी जिथे मला मते मिळाली नाहीत. त्या सर्व सामाजिक संघटना या वेळेस माझ्या पाठीशी आहेत.  माझ्याकडे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, नेते पण येतात. माझ्या कामाची संसदेत सोनिया गांधी, राहुल गांधी यांनीही दखल घेतली घेत दाद दिली होती, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. मी चुकीच्या कामाचे समर्थन करीत नाही, पक्षविरहित काम हेच माझे भांडवल आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Back to top button