Nagpur News: गणित चुकलं म्हणून पाचवीच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची क्रूर मारहाण; हात झाला फ्रॅक्चर; नागपूरमधील धक्कादायक प्रकार

Nagpur Teacher Beating Student: गणिताचे उत्तर चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याची घटना कुही तालुक्यातील देवळी कला येथे घडली आहे.
Nagpur Teacher Beating Student
Nagpur Teacher Beating Studentpudhari
Published on
Updated on

Nagpur Teacher Beating Student

नागपूर: गणिताचे उत्तर चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याची घटना कुही तालुक्यातील देवळी कला येथे घडली आहे. मारहाणीत विद्यार्थिनीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी चाइल्ड हेल्पलाईनच्या हस्तक्षेपानंतर शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर वाडी भसमे, असे या शिक्षकाचे नाव आहे.

Nagpur Teacher Beating Student
Nashik Inspiring story | रुग्णवाहिकेतून दिला दहावीचा पेपर; हर्षल चौधरीची जिद्द ठरली प्रेरणादायी

देवळी कला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पाचवीच्या वर्गात पीडित विद्यार्थिनी शिकते. १० मार्च रोजी देवळीकला विद्यालयातील वर्गात तास सुरू होता. यावेळी शिक्षकाने दिलेल्या गणिताच तिने चुकीचं उत्तर दिलं. गणित का चुकलं, म्हणत संतापलेल्या शिक्षकाने तिला मारहाण केली. यामध्ये तिच्या हाताला जबर दुखापत झाली.

या घटनेची चाईल्ड हेल्पलाईनला माहिती मिळताच विद्यार्थिनीच्या घरी जाऊन त्यांनी चौकशी केली. मारहाणीनंतर शिक्षकाने विद्यार्थिनीच्या पालकांना बोलावून याबाबत कोणाला सांगितल्यास मुलीला शाळेतून काढण्याची धमकी दिली होती, असे पालकांनी सांगितले.

Nagpur Teacher Beating Student
Malegaon News | हिरे कुटुंबाला मोठा झटका! आर्थिक गैरव्यवहार आणि पटसंख्येतील घोळामुळे शिक्षण विभागाचा 'हातोडा'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news