Nashik Inspiring story | रुग्णवाहिकेतून दिला दहावीचा पेपर; हर्षल चौधरीची जिद्द ठरली प्रेरणादायी

अपघातानंतरही शिक्षणाविषयी तळमळ, बोर्डाच्या विशेष परवानगीने रायटरच्या च्या मदतीने दिला पेपर
Nashik Inspiring story
Nashik News | रुग्णवाहिकेतून दिला दहावीचा पेपर; हर्षल चौधरीची जिद्द ठरली प्रेरणादायी
Published on
Updated on

सिडको : अपघातासारख्या गंभीर प्रसंगानंतरही शिक्षणाविषयीची जिद्द कायम ठेवत रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूल, उपेंद्रनगर येथील दहावीचा विद्यार्थी हर्षल ज्ञानेश्वर चौधरी याने सायन्स–२ विषयाचा पेपर थेट रुग्णवाहिकेतून रायटरच्या मदतीने पूर्ण केला. प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता परीक्षेला सामोरे गेलेल्या हर्षलच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे.

हर्षलचा परीक्षेच्या आदल्या दिवशी गंभीर अपघात झाला होता. अपघातात तो जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार करतील; मात्र हर्षलने आपली दहावीची परीक्षा कोणत्याही परिस्थितीत देण्याचा निर्धार केला. शिक्षणाबद्दलची त्याची तळमळ पाहून कुटुंबीय तसेच शाळेच्या शिक्षकांनीही त्याला पूर्ण साथ दिली. विशेष परवानगी घेऊन दि. १३ मार्च रोजी जनता विद्यालय केंद्राच्या आवारात रुग्णवाहिकेतच परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानुसार हर्षलने रायटरच्या मदतीने सायन्स–२ विषयाचा पेपर शांतपणे पूर्ण केला. उपचार सुरू असतानाही त्याने दाखवलेली चिकाटी आणि धैर्य पाहून उपस्थित सर्वजण भावूक झाले.

Nashik Inspiring story
SSC HSC exam copy cases : दहावी-बारावी परीक्षेत आतापर्यंत ६२ कॉपी केसेस

या संपूर्ण प्रक्रियेसाठी रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूल, उपेंद्रनगरच्या प्राचार्या डॉ. स्मिता चौधरी यांनी पुढाकार घेत नाशिक बोर्डातील देसले सर तसेच संबंधित परीक्षा केंद्राशी समन्वय साधून आवश्यक परवानगी मिळवली. या प्रक्रियेत अध्यक्ष सुभाष बोरसे, सचिव मोहन देसले, परीक्षा समिती प्रमुख रुपेश आवारे आणि शाखा प्रमुख हेमंत पगारे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्यांनी सकारात्मक भूमिका घेत विद्यार्थ्याच्या परीक्षेसाठी आवश्यक मदत केली.

Nashik Inspiring story
Satara SSC Exam: नातवंडांसोबत आजींनीही दिली 10 वीची परीक्षा

तसेच जनता विद्यालय येथील केंद्र संचालक अण्णासाहेब ठाकरे, उपकेंद्र संचालक अरुण दातीर व शैलेश देवरे तसेच सह परिरक्षक प्रदीप ठाकरे यांनीही सकारात्मक भूमिका घेत विद्यार्थ्याच्या परीक्षेसाठी मदत केली. यामध्ये त्यांचे विशेष सहकार्य लाभले. या संपूर्ण प्रक्रियेत रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूलचे शिक्षकवृंद निवेदिता महाजन, सोनाली कारंडे आणि मृणालिनी गोस्वामी यांनी विद्यार्थ्याला मानसिक व शैक्षणिक आधार देत सहकार्य केले.

शाळा प्रशासन व शिक्षकांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल हर्षलचे पालक किरण चौधरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मनापासून आभार व्यक्त केले. तसेच उपचारादरम्यान सहकार्य केल्याबद्दल डॉ. अजिंक्य देसले यांचेही विशेष आभार मानले. प्रतिकूल परिस्थितीसमोर न डगमगता शिक्षणासाठी दाखवलेली हर्षलची जिद्द आणि धैर्य अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी दृढ इच्छाशक्ती असेल तर यशाचा मार्ग नक्की सापडतो, याचा जिवंत आदर्श हर्षल चौधरीने घालून दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news