Monsoon Session | नागपुरात वसुलीसाठी आरटीओ अधिकाऱ्यांचे मोठे रॅकेट; विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेत आरोप

नावांसह ऑडिओ क्लिप्सही दिल्या, भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली, करचुकवेगिरी आणि नोंदणी प्रक्रियेतील अनियमितता या मुद्द्यांवर विधानसभेत चर्चा
Congress Leader Wadettiwar Speech Vidhan Sabha
Vijay WadettiwarPudhari
Published on
Updated on

Vijay Wadettiwar on Nagpur RTO Racket

नागपूर : परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. यासंदर्भात ऑडिओ क्लिप्सही दिल्या. भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली, करचुकवेगिरी आणि नोंदणी प्रक्रियेतील अनियमितता या मुद्द्यांवर विधानसभेत चर्चा झाली. यावेळी त्यांच्या अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांच्या ऑडिओ क्लिप्स सभागृहात मांडल्या.

प्रश्नोत्तर काळात वडेट्टीवार यांनी नागपूर आरटीओमध्ये चोरीच्या वाहनांच्या नोंदणीसह मोठ्या गैरव्यवहारांचा आरोप केला. परिवहन विभागात संघटित वसुली रॅकेटची कार्यपद्धती वडेट्टीवार यांनी मांडली. या रॅकेट मधील अधिकाऱ्यांना १५ वर्षाहून अधिक काळ विदर्भात पोस्टिंग देण्यात आली आहे.

Congress Leader Wadettiwar Speech Vidhan Sabha
Monsoon Session | हत्तीच्या हल्ल्यात चार जणांचा बळी : घटना रोखण्यासाठी  विशेष टास्क फोर्स स्थापन करा

बजरंग खरमाटे (निवृत्त RTO अधिकारी), रविंद्र भुयार (प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला), राजू नागरे (निलंबित मोटार वाहन निरीक्षक, अमरावती), आनंद मोड (मोटार वाहन निरीक्षक, गोंदिया), योगेश खेसनार (निलंबित मोटार वाहन निरीक्षक, खामगाव) हे अधिकारी मिळून बेकायदेशीर वसुली करतात. वसुलीला नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांना टार्गेट करतात. ट्रान्सपोर्टरमार्फत तक्रारदार उभे केले जातात. एसीबी ट्रॅपसाठी नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती निर्माण केली जाते, अशा अधिकाऱ्यांना अडकवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा खळबळजनक आरोप वडेट्टीवार यांनी सभागृहात केला.

याबाबतच्या ऑडिओ क्लिप देखील वडेट्टीवार यांनी अध्यक्षांना सादर केल्या. महाराष्ट्राचा महसूल बुडत असल्याचा मुद्दा उपस्थित करत महागड्या आयातीत वाहनांची नोंदणी महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांत करून करचुकवेगिरी होत असल्याचा आरोप केला.

Congress Leader Wadettiwar Speech Vidhan Sabha
Monsoon Session | नगराध्यक्ष व नगरसेवकांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार द्या; आ. संजय गायकवाड यांची विधीमंडळात मागणी

यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशीची घोषणा केली. आयपीएसअधिकारी प्रियांका ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आली आहे. ती एका महिन्याच्या आत अहवाल सादर करेल. वडेट्टीवार यांनी घेतलेल्या सर्व नावांची आणि आरोपांची चौकशी केली जाईल. सेवेत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल तपासणी केली जाईल.

चौकशी अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात वास्तव्यास असूनही इतर राज्यांत वाहन नोंदणी करून करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियम अधिक कडक करण्याचा विचार सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news