MD Drugs Seized Nagpur | नागपुरात मोठी कारवाई; 21 ग्रॅम एमडीसह 17.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन आरोपी ताब्यात, एनडीपीएसमधील रेकॉर्डवरील आरोपी फरार; स्कॉर्पिओ, मोबाईल आणि एमडी पावडर जप्त
MD Drugs
एमडी ड्रग्स file photo
Published on
Updated on

Nagpur Anti Narcotics Cell

नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत 21 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) सदृश्य अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण 17 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्ट रोजी पहाटे 2.30 ते 4.20 वाजण्याच्या दरम्यान गोरेवाडा रिंगरोडवरील स्वागत नगर येथील स्टार मोटर्स मल्टी कार वर्कशॉपसमोरील रस्त्यावर अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून कारवाई केली. तपासणीदरम्यान आरोपींकडून 21 ग्रॅम एमडी सदृश्य पावडर जप्त करण्यात आली.

MD Drugs
Nagpur Ganeshotsav | नागपुरात गणेशोत्सवासाठी 'एक खिडकी' योजना; परवानग्या ऑनलाइन देण्याचे महापौरांचे निर्देश

या कारवाईत 2 लाख 10 हजार रुपये किमतीची एमडी सदृश्य पावडर, अंदाजे 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि अंदाजे 15 लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी असा एकूण 17 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात दानिश खान अबरार खान (वय 42, रा. जाफरनगर, नागपूर) आणि मुकर्रम मुनावर अली काझी (वय 32, रा. स्वागत नगर, नागपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर सय्यद इरफान अली (अंदाजे वय 34, रा. मोमिनपुरा, नागपूर) हा फरार असून तो एनडीपीएस कायद्याअंतर्गत यापूर्वीही नोंद असलेला आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

MD Drugs
Nagpur news: अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील दोषींवर होणार कठोर कारवाई; चंद्रशेखर बावनकुळे

या प्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(ब) आणि 29 अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news